१
पंचायतीने संमत केलेले ठराव अमलात आणणे.
२
पंचायतीकडे सोपवलेली कर्तव्ये रितसर पार पाडण्याची जबाबदारी आहे.
३
पंचायतीच्या सभा बोलावणे, सभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहणे व सभेचे नियमन करणे.
४
पंचायतीच्या सर्व अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांनी केलेली कार्यवाही करणे व नियंत्रण ठेवणे.
५
आवश्यक असलेली सर्व विवरण पत्र व प्रतिवृत्ते तयार करण्याची व्यवस्था करणे.
६
ग्रामसभेच्या बैठकी बोलावणे व सदर बैठकीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणे.
७
शासनाच्या कोणत्याही निदेशान्वये देणे आवश्यक असतील अशी प्रमाणपत्रे देणे.
८
सचिवाच्या ताब्यात नोंदवह्या ठेवणे, त्यावर देखरेख ठेवणे व वेळोवेळी तपासणे.
९
शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे.